Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : पहिल्या काही दिवसात सूरजला एकटं पाडण्यात आल्याचे चित्र होते. मात्र, सूरजने आता घरातील सदस्यांचे आपल्याबद्दलचे मत बदलण्यास भाग पाडले आहे.
बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमध्ये सूरज चव्हाणने एन्ट्री केल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मीडियावर सूरजला ट्रोल करण्यात आले. बिग बॉसच्या घरात गुलिगत सूरजला खेळ कळलाच नाही, असे म्हटले जाऊ लागले. पण त्याने स्वत:वर मेहनत घेतली आणि आपला खेळ दाखवायला सुरुवात केली आहे. वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनेदेखील सूरजच्या खेळीचं कौतुक केले. तसेच त्याला यापुढेही गुलिगत पॅटर्नने खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले.