प्रतिनिधी
दिवाळीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आज लक्ष्मीपूजन आहे. या निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुंदर फुलांची सजावट करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
या सजावटीसाठी पांढरी शेवंती अंदाजे 650 किलो, भगवा झेंडु अंदाजे 180 किलो, पिवळा झेंडू अंदाजे 250 किलो, पिंक फुले (कण्हेर) अंदाजे 35 किलो, अष्टर अंदाजे 300 किलो, हिरवा पाला अंदाजे 200 माळा, गुलाब १०० गड्डी, कमिनी ३०० गड्डी, शेवंती १०० गड्डी इत्यादी फुलांचा वापर करण्यात आला आहे. सेवेकरी अर्जुन हनुमान पिंगळे, बीड यांनी सेवाभावी तत्वावर मोफत फुलांची आरास करून दिली आहे. या फुलांच्या सजावटीसाठी श्री फ्लावर्स पुणे यांच्या सुमारे 25 कामगारांनी परिश्रम घेतल्याचे कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
दिवाळीच्या लक्ष्मीपूजनानिमित्त विठ्ठल दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या पार्श्वभूमीवर मंदिराची केलेली आकर्षक सजावट मनमोहक दिसून येत असून, या सजावटीमुळे संपूर्ण मंदिराचं रुपडं पालटून गेलं आहे.