Prathamesh Parab & Kshitija Special Diwali Celebration
सगळ्यांचा लाडका दिवाळी सण आला असून सगळीकडेच या सणाचा उत्साह पाहायला मिळतोय.
सामान्य लोकांबरोबर सेलिब्रिटीजही दिवाळी उत्साहाने साजरी करत आहेत. अभिनेता प्रथमेश परब याच वर्षी लग्नबंधनात अडकला आणि त्याने त्याची पहिली दिवाळी खूप खास साजरी केली आहे.
प्रथमेश परब आणि त्याची पत्नी क्षितिजाने त्यांची लग्नानंतरची पहिली दिवाळी स्पेशल करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कोणताही गाजावाजा न करता त्यांनी त्यांची दिवाळी दिव्यांग मुलांच्या शाळेत साजरी केली.
त्यांच्यासाठी फराळ, गिफ्ट घेऊन जात त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवला.