सोलापूर, दि. १९ ऑगस्ट –
सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन व शरदचंद्र पवार प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने
जिल्हा खो-खो पंच प्रशिक्षण शिबिर मुख्याध्यापक भवनच्या हॉलमध्ये संपन्न झाले. यात जिल्ह्यातील ५० पंच खो खो नियमाबाबत अपडेट झाले.
या शिबिराचे उद्घाटन माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष महेश गादेकर, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील चव्हाण, सरचिटणीस ए. बी. संगवे आदी उपस्थित होते. असोसिएशनचे सहसचिव राजाराम शितोळे यांनी प्रास्ताविक केले. अविनाश अलदर यांनी सूत्रसंचालन केले श्रीराम बरगंडे यांनी आभार मानले. समारोपप्रसंगी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
राहुल माशाळकर यांचे पावरपॉइंटद्वारे प्रेझेंटेशन
या शिबिरास राष्ट्रीय पंच राहुल माशाळकर यांनी उपस्थित पंचांना खोखो नियमावर पावरपॉइंटद्वारे प्रेझेंटेशन केले. तसेच ज्येष्ठ पंच गुलाम मुजावर, राष्ट्रीय पंच श्रीरंग बनसोडे, पंचमंडळ सचिव गोकुळ कांबळे, तांत्रिक समिती सचिव उमाकांत गायकवाड, पंचमंडळ सदस्य अजित शिंदे, पुंडलिक कलखांबकर, सोनाली केत, सोमनाथ राऊत, नागेश माडीकर, लखन कांबळे, शहाबुद्दीन मुलाणी, शेखलाल शेख यांनीही मार्गदर्शन केले.