Royal Challenge Bengluru Captain Virat Kohli | IPL | RCB Fans | Virat Kohli Fans | Jerssy No 18
IPL 2025 | इंडियन प्रीमिअर लीग २०२५ ची जय्यत तयारी झाली आहे. पुढील महिन्यात 24-25 तारखेला मेगा ऑक्शन होणार आहे आणि त्यात मोठी नावं दिसतील हे जवळपास पक्कं झालं आहे. के एल राहुलला लखनौने, श्रेयस अय्यरला कोलकाता नाइट रायडर्स यांनी रिलीज केल्याचे वृत्त समोर आले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नेहमी प्रमाणे विराट कोहलीला रिटेन करणार आहेत, पंरतु यावेळी विराट पुन्हा एकदा कर्णधारपदी दिसू शकतो. विराट कोहली IPL2025 सीझनमधून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचा कर्णधार म्हणून परतण्यास सज्ज आहे. कोहलीने याबाबत आधीच संघ व्यवस्थापनाशी चर्चा केली आहे. ४० वर्षीय फॅफ डू प्लेसिसने शेवटच्या २०२२-२४ या कालावधीत फ्रँचायझीचे नेतृत्व केले, परंतु आता वयामुळे RCB नवा कर्णधाराच्या शोधात आहेत. विराटने स्वतःहून पुन्हा नेतृत्व सांभाळण्याची तयारी दर्शवली आहे.