man marathi news network,
solapur News –
मनीष काळजे यांचे शिवसेना संपर्क कार्यालयासमोर पोलीस अधिकाऱ्यांची गच्ची पकडून धक्काबुक्की करून विनयभंग करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिघांना जामीन मंजूर = अँड. रियाज एन. शेख
सोलापूर. – दि. 20 जून 2024 रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील सात रस्ता परिसरामध्ये मनीष काळजे यांचे शिवसेना संपर्क कार्यालयाच्या समोर गोंधळ घालत असताना व सदर ठिकाणी पोलिसांनी शांतता प्रस्थापित करत असताना अडवणूक केल्या नंतर पोलीस वरिष्ठ पोलीस सदर बाजार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांची गच्ची पकडून त्यांच्याशी हुज्जत घालून धक्काबुक्की करून महिला अधिकारी हे सोडवण्याकरिता महिला पोलीस उपनिरीक्षक हे सोडवा सोडवी करण्याकरिता मध्ये आले असता त्यांचे हात ओढून त्यांच्या शरीरास ठिकठिकाणी नकोसा स्पर्श करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून सरकारी, त अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सादिक उलफत हुसेन शेख, सोहेल सादिक शेख, मोहसीन सादिक शेख सर्व रा- सहारा नगर, होटगी रोड, सोलापूर यांना सोलापूर येथील विशेष सत्र न्यायाधीश श्री एस.व्ही. केंद्रे साहेब यांनी जामीन मंजूर केलेला आहे. आरोपी तर्फे अँड. रियाज एन. शेख यांनी तर सरकार पक्षातर्फे शैलेजा क्यातम यांनी काम पाहिले.